संपूर्ण राज्यातच पिण्याचे पाण्याचे संकट
सोलापूर – जिल्ह्यात गतवर्षी पाऊस अत्यल्प झाल्यामुळे उजनी जलाशयाच्या पाण्याची पातळी निचाकी टक्के असून जिल्ह्यात 58 टँकरने 53 गावा, 407 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या ही स्थिती असून एप्रिल, मे व जून महिने पाहता पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करणे गरजेचे असल्याचे डॉ. पृथ्वीराज माने यांनी सांगितले.
मा. पृथ्वीराज माने युवा मंच शाखा तिर्हे यांच्या वतीने ब्रह्मसुमित्रा पाणी पोईचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब सुरवसे भारत जाधव सरपंच गोवर्धन जगताप युवा मंच तालुका अध्यक्ष सुनील जाधव, समन्वयक ॲड. अजित पाटील, उमेश भगत, संयोजक अजय सोनटक्के, तात्या कदम, किरण बंडगर,शहाजी भोसले महेंद्र खटके सागर तांबे भास्कर सुरवसे, ओंकार जावीर शिवाजी सुरवसे दिगंबर सोनटक्के अनिल गवळी अरविंद जाधव नेताजी सुरवसे संजय राठोड तुकाराम मलाव बबलू सुरवसे मारुती लवटे शिवाजी काशिद महामुद्द शेख शंकर जाधव देवीदास घदुरे शरद पवार बिभीषण मलाव संदीप सुरवसे महेश आसबे मलाव दिपक मलाव गुरुदेव गायकवाड बालाजी गायकवाड राहुल गायकवाड रावसाहेब गायकवाड भगवान चव्हाण सुरेश राठोड बजरंग गवळी बलभीम शिंदे राजू मलाव आनंद जाधव नंदू जाधव प्रसाद गवळी संजय सोनटक्के प्रमोद सोनटक्के दगडू सोनटक्के विष्णु सोनटक्के विजय सोनटक्के खंडू सोनटक्के महेश सोनटक्के चेतन बंडगर राजू मलाव अशोक गायकवाड व आदी ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गतवर्षी राज्यात व जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे राज्यातील मोठी धरणातील पाणीसाठा वजा पातळीवर गेला आहे. मध्यम लघु प्रकल्प कोरडे पडत चालली आहे. भूजल पातळी खोलीवर गेली आहे. सध्याचे तापमान पाहता एप्रिल, मे व जून मध्ये भयानक परिस्थिती निर्माण होणार असून उपलब्ध पाणी योग्य नियोजन हवे व पाणी जपून वापरा असे डॉ. माने यांनी सांगितले.