मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासूनच्या जागावाटपच्या भिजत घोंगड्यावर महाविकास आघाडीनं तोडगा काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी 10 जागा सुटल्या असून त्यापैकी 7 उमेदवारांची घोषणा पक्षाकडून आधीच करण्यात आली होती. आज तिसरी यादी जाहीर करुन पक्षानं आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली. शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना आणि रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे.

महाविकास आघाडीनं मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला. जागावाटप जाहीर झाला असला तरीही महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्षांकडून अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. अशातच आज शरद पवार गटानं लोकसभा निवडणुकांसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. यासंदर्भात ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन ट्वीट केलं आहे.