सोलापूर – प्रभाग क्रमांक 25 हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, विमानतळ परिसरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन बैठक मातोश्री सिद्धवाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडी च्या उमेदवार आ.प्रणिती शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयकुमार हतुरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, काँग्रेसचे नितीन भोपळे, युवा सेनेचे शहर प्रमुख राम कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे सचिवा गौरा कोरे, ज्येष्ठ नागरिक सोनार मामा, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार, ज्येष्ठ साहित्यिक चेन्नवीर भद्रेश्वरमठ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे असे म्हणाले की गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपाचे खासदार असल्यामुळे सोलापूर विकासापासून वीस वर्षे मागे पडला आहे. जुळे सोलापूर हद्द वाढ भागामध्ये कोणत्याही विकासाचे काम मागील दोन्ही खासदारांनी केले नाहीत. सोलापूर शहर हद्दवाढ भागाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार लोकसभेत पाठवा असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या पंधरा वर्षातील विकास कामाचा ऊहापोह केला व काँग्रेस उमेदवाराला जुळे सोलापूर व हद्दवाढ भागातून पन्नास हजार मताधिक्याने देऊ अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी सुधाकर कोरे, उत्तर सोलापूर महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष पाटील, शहर महिला काँग्रेसच्या सचिवा वर्षा अतनुरे, सुनिता राजपूत, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धीरज खंदारे, शंकर नगर येथील महिला बचत गटाचे प्रमुख गीता वारे,क्रांतीसुर्य संघटनेचे अध्यक्ष महेश आठवले,पीजी ग्रुपचे लक्ष्मण किणीकर, शैलेश शेवगार, नागेश हत्तुरे,पप्पू पाटील, राज हत्तुरे कोरे वस्तीचे मालक लहू कोरे, इनामदार चाचा,सलीम शेख,रुद्रप्पा कांबळे,बाळू सावंत,अप्पू बिराजदार,ओंकार हत्तुरे, सिद्धार्थ हत्तुरे,संदेश हत्तुरे, रिक्षा संघटनेचे किरण राठोड,राम जाधव,नागेश धुम्मा, गंगाधर कांबळे आदी सह या परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बनसोडे सर तर आभार प्रदर्शन नागेश पडनुरे यांनी केले.