साई समर्थ फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत “दोन तास” हा उत्कृष्ठ मराठी लघुपट खुप कमी कालावधीत लोकप्रिय झाला आहे. या लघुपटातील सर्व कलाकार सोलापुरातील असून सर्व चित्रीकरण सोलापूर शहरातच झाले आहे. या लघुपटाची निर्मिती डॉ. सुखदेव दत्तु शिनगारे यांनी केली असून दिग्दर्शन शहाजी कांबळे यांनी केले आहे. मुख्य भूमिकेत राहुल चवरे आणि वेया माशाळ आहेत. तर इतर कलाकर मध्ये श्रेया जाधव, पार्वती चव्हाण, आहेत. ओवी तडवळकर हिने डबिंग कलाकर म्हणून काम केले आहे. निर्मिती व्यवस्थापक म्हणून सोमनाथ लोखंडे, राकेश जाधव यांनी काम पहिले आहे. गायक निखील भालेराव, पार्श्वसंगीत- निनाद म्यूजिक स्टुडिओ, छायाचित्रण आणि संकलन – एजाज शेख. अशा सर्वांच्या मदतीने हा लघुपट पूर्ण करण्यात आला आहे.
कथानक – एका खासगी कंपनीत काम करणारा तरुण लेबर, एका बाईच्या शोधात असतो. त्याला बाई मिळत नाही. शेवटी तो एका वेश्या बाईला तासाला चारशे रुपये प्रमाणे ठरवून तो घेऊन जातो. पुढे यांच्यात घडणाऱ्या गोष्टी पाहण्या सारख्या आहेत. जीवाला हुरहूर, मनाला चटका लावणारे क्षण आहेत. सर्वांनी आवर्जून पाहावा असा हा लघुपट आहे.
सोलापूर च्या मातीत तयार झालेला हा लघुपट आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रेक्षांपर्यंत पोहोचावा. या लघुपटाचे, कलाकारांचे कौतुक व्हावं आणि आमच्या पुढील कलाकृतीस प्रोत्साहन मिळावं अशी आशा आहे.
हा लघुपट युट्यूब वर Dr.S.D. Shingare या चॅनेलवर पाहायला मिळेल. युट्यूब वर “Don Taas Marathi Short Film असं हि सर्च करू शकता.
या लघुपटाला आता पर्यंत काही पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
कलानगरी कोल्हापूर फिल्म फेस्टिवल फॉर बेस्ट स्टोरी
स्टुडल्ट वर्ड इम्पॅक्ट फिल्म फेस्टिवल फॉर होनरेबल मेंशन अवार्ड
रोशन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल फॉर बेस्ट शॉर्ट फिल्म
मुंबई मराठी फिल्म फेस्टिवल फॉर बेस्ट ऍक्टर