येस न्युज नेटवर्क : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत शिवसेना ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विद्यमान खासदार आणि जुन्या चेहऱ्यांसह नवीन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून आता दुसरी यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटांकडून आणखी पाच जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले नाहीत. त्यापैकी काही मतदारसंघ हे वंचित बहुजन आघाडीला सुटू शकतात. वंचितसोबतची चर्चा अद्यापही पूर्ण झाली नाही.
17 जागावरील उमेदवार जाहीर
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ – संजोग वाघेरे-पाटील
सांगली -चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
नाशिक – राजाभाई वाजे
रायगड – अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
परभणी – संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर न केलेल्या जागा कोणत्या?
महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेनुसार, शिवसेना ठाकरे गटाला 22 जागा सुटल्या असल्याची चर्चा आहे. त्यापैकी 17 जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. तर, पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.