सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या श्रीराम मंदिर वंदन एटीएम कार्डचे अनावरण थाटात करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत बँकेच्या मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
सोलापूर जनता सहकारी बँकेने या श्रीराम मंदिर वंदन एटीएम कार्डसाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची परवानगी मिळवली आहे. या कार्डच्या अनावरणाच्या निमित्ताने सोलापूर जनता सहकारी बँकेकडून खास सुविधा ग्राहकांसाठी देण्यात आली आहे. श्रीराम मंदिर वंदन एटीएम कार्डधारकांना एका दिवसाला ४० हजार रुपयांऐवजी (महत्तम मर्यादा) एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम एटीएममधून काढता येणार आहे.
ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा आणि कार्ड मिळवण्यासाठी जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत संपर्क साधावा, असे आवाहनही बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी केले. या कार्यक्रमास सोलापूर जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, संचालक वरदराज बंग, सी. ए. गिरीश बोरगावकर, मुकुंद कुलकर्णी, राजेश पवार, विनोद कुचेरिया, रवींद्र साळे, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, उपसरव्यवस्थापिका अंजली कुलकर्णी, सहाय्यक सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, रामदास सिद्धूल, मकरंद जोशी, मुख्याधिकारी शरद कुलकर्णी, रमेश मामड्याल, अनंत ताशी, लक्ष्मण सुतार, प्रशासन विभागातील अधिकारी मदन मोरे तसेच मुख्य कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.