सोलापूर :- जागतिक महिला दिनानिमित्त अनुभव प्रतिष्ठान सोलापूर, ट्रस्ट यांच्यावतीने महिला नृत्य स्पर्धा 2024 आयोजन विणकर सभागृह कन्ना चौक येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणेच्या हस्ते सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन करून.कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पोलीस महिला सांगिता धनंजय महाजन, अधिव्यखता भौतिक शास्त्र, शासकीय तंत्र निकेतन संगीता जयवंत मुनावळी, आदी उपस्थिती होती.यावेळी प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष महेश भाईकट्टी यांनी केले.
यश मिळवताना कष्ट, चिकाटी,जिद्द, साहस, धाडासी या सार्वचे एकत्रिकरण करणे म्हणेज यश संपादन होय. संस्थेचे कार्य अतिशय गोर गरीब महिलापर्यंत मदत पोहचवतात.असे बोलताना महाजन यांनी आपले मत व्यक्त केले.महिलांनी एकमेकांना सोबत घेऊन पुढे जात आहे. जी महिला आंनदी असते ती कुटूंबलाही आंनदीत ठेवते.संस्थेचे काम उल्लेखनिय आहे. असे बोलताना सातवेकर मॅडम यांनी आपले मत व्यक्त केले.
सुत्रसंचालन संस्थेचे सचिव गणेश येळमेली व सौ शशिकला मठपती यांनी केले तर,आभार प्रदर्शन संस्थेचे महिला सदस्य सौ सुनंदा भाईकट्टी यांनी केले.परीक्षक म्हणून प्रणिती दोंतुल, ऐश्वर्या सलगर, कोमल दवणे यांनी काम पहिले.
सोलो डान्स
प्रथम क्रमांक
कु.गीतिका गिरीधर शेट्टी
1101 रुपये रोख पारितोषिक व सम्मान चिन्ह
द्वितीय क्रमांक
संस्कृती दत्तात्रय गवंडी
701रुपये रोख पारितोषिक व सम्मान चिन्ह
तृतीय क्रमांक
सर्वस्वी शशिकांत महाकाल
501रुपये रोख पारितोषिक व सम्मान चिन्ह
ग्रुप डान्स
प्रथम क्रमांक
जगदंबा ग्रुप
5001 रुपये रोख पारितोषिक व सम्मान चिन्ह
द्वितीय क्रमांक
ऍक्टिव्ह डाँसिन्ग वूमेन ग्रुप
2501 रुपये रोख पारितोषिक व सम्मान चिन्ह
तृतीय क्रमांक
विघ्नहर्ता डान्स ग्रुप
1151 रुपये रोख पारितोषिक व सम्मान चिन्ह
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला सदस्या श्वेता कालदीप, संगीता नागणसुरे, कविता येळमेली, मीनाक्षी शिवशिंपी, दिव्या कालदीप, भाग्यश्री बुऱ्हाणपूरे, पल्लवी बुऱ्हाणपूरे,वर्षा हलकुडे आदींनी परिश्रम घेतले.