मोहोळ : मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे रविवार(दि२६)रोजी एक महिला कोरोना ग्रस्त आढळून आल्यानंतर खबरदारी म्हणून तातडीने मोहोळ चे लोकप्रिय आमदार यशवंत(तात्या)माने साहेब यांनी सोमवार दिनांक २७ एप्रिल रोजी मोहोळ येथे तहसील कार्यालयात कोरोना च्या पार्श्वभूमी वर प्रशासनाकडून आढावा घेऊन तातडीने करावयाच्या उपाययोजना संदर्भात आढाव बैठक घेऊन तहसीलदार,गटविकास अधिकारी व आरोग्य विभागास सूचना केल्या.
तसेच मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे रविवार दिनांक २६ रोजी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने आमदार यशवंत माने साहेब यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी समवेत कोरोनाग्रस्त रुग्णाच्या घराची परिसराची व पेनुर गावात जावून पाहणी केली तातडीने करावयाच्या उपाययोजना संदर्भात सूचना केल्या व मंगळवार दिनांक २८ पासून पेनुर व पाटकुल भागातील होम टु होम जावून कुंटुंबातील प्रत्येक सदस्याची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० थर्मल स्कॅनर च्या साहाय्याने प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यासाठी आदेश दिले आहेत.त्यानुसार मंगळवार दिनांक २८ पासून आमदार यशवंत माने साहेब यांच्या पुढाकाराने पेनुर व पाटकुल होमटु होम सर्वेक्षण होणार आहे
यावेळी तहसीलदार मा जीवन बनसोडे,गटविकास अधिकारी अजिंक्य येळे,मोहोळ ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पी पी गायकवाड,पंचायत समिती चे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण पाथरुडकर,तसेच मा श्री मानाजी बापू माने,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,पेनुर चे उपसरपंच रामदास चवरे,पोलीस पाटील,तलाठी,ग्रामसेवक,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.