सोलापूर : केगाव येथील एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सिंहगड संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ .रवींद्र व्यवहारे व डॉ. शेखर जगदे, डॉ.दत्तात्रय गंधमल, डॉ.विनोद खरात,डॉ. विजयकुमार बिरादार, डॉ. प्रदीप तपकिरे, नागेश पाथरूट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सर सी. वी. रमण यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्राचार्य डॉ.शंकर नवले यांनी सुरुवातीला राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून प्रथम वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला होता. त्याबरोबरच स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन या राष्ट्रीय स्पर्धेत सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त केले तसेच इतर दोन संघांनी अंतिम फेरी गाठत जोरदार लढत दिली या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट झालेल्या सिंहगड करंडक स्पर्धेमध्ये पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थ्यांनी फॅशन शो या कला प्रकारात द्वितीय क्रमांक तर समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तसेच इतर कलाप्रकारात देखील विद्यार्थ्यांनी जोरदार सादरीकरण केले याबद्दल विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.सिंहगड मध्ये झालेल्या मल्टीमेगा इव्हेंट मध्ये प्रकल्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रकल्प प्रदर्शनामधील उत्कृष्ट प्रकल्पांना देखील यावेळी पारितोषिक देण्यात आले
सिंहगड इन्स्टिट्यूट चे कॅम्पस डायरेक्टर मा. संजय नवले सर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी व आपला व्यक्तिमत्व विकास करावा त्यासाठी सिंहगड संस्था नेहमीच प्रयत्नशील असते असे नमूद केले व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.विनोद खरात व सूत्रसंचालन प्रा .रविंद्र देशमुख यांनी केले