मराठी भाषा गौरव दिन, लिडकॉमचे सुवर्ण महोत्सवी वर्ष तसेच, संत रविदास महाराज, छ. शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त लिडकॉम, सकल चर्मकार समाज, सम्राट अशोक विचार मंच व संत रोहिदास समाज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून, अहमदनगर येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रमात महाराष्ट्राचे नामवंत शाहीर रमेश खाडे यांना लिडकॉम अधिकारी उदय देवकर, ज्येष्ठ समाज सेवक गोविंदराव खटावकर, आयोजक नितीन भटकर व विजय घासे यांचे शुभहस्ते आणि मंचावरील सूर्यकांत गवळी, अशोक विजयकर, शिवाजीराव साळवे, निलेश बांगर, पोलिस अधिकारी बालाजी सोनटक्के, समाज सेविका मीराताई शिंदे व अन्य मान्यवरांचे उपस्थितीत महावस्त्र, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करुन, जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
शाहीर रमेश खाडे यांनी आजवर केलेल्या शासकीय अभियांन्त्रिकी सेवेसह त्यांच्या अध्यात्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक सेवेची दखल घेऊन, त्यांना हा जीवन गौरव सन्मान बहाल करताना मनस्वी आनंद होत असल्याचे, मान्यवरांनी बोलून दाखवले. यावेळी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी जोरदार टाळ्या वाजवून, त्यांचे अभिष्टचिंतन केले.
शाहीर रमेश खाडे यांच्या या जीवन गौरव सन्मानाबद्धल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, समाज माध्यमांतूनही त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.