सोलापूर– अंध व्यक्ती सर्वच क्षेत्रात डोळसपणे काम करतात, जगासोबत चालण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतात. त्यामुळे कॉलसेंटर्स, एफ एम रेडिओ या क्षेत्रातही ते सरस ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एन टी पी सी सोलापूर युनिटच्या सृजन महिला मंडळाच्या सदस्यांनी येथील भैरू रतन दमानी अंधशाळेस दहा बोलके संगणक देणगी स्वरूपात भेट म्हणून दिले . या संगणक कक्षाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


प्रारंभी या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे सचिव संतोष भंडारी यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश दर्शनाळे यांनी शाळेची माहिती आणि कार्याचा आढावा सादर केला. प्रमुख अतिथी सुनील खमीतकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सोलापूर यांच्या शुभहस्ते फीत कापून या संगणक कक्षाचे उदघाटन करण्यात आले. शाळेचे विश्वस्त राजगोपाल झंवर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच सृजन महिला मंडळाच्या श्रीमती नुपूर बंडो पाध्याय यांचा सत्कार रोटरी नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी केला. ललिता मॅडम आणि अनुराधा मॅडम यांचा सत्कार अंध शाळेचे सचिव संतोष भंडारी आणि डॉ संपत बलदवा यांच्या हस्ते करण्यात आला.

राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयाचे सचिव सुनील दावडा यांनी उषा बैरागी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.सृजन महिला मंडळाच्या कार्याची माहिती सचिवा अनुराधा मॅडम यांनी दिली आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास रोटरी नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा,अंधशाळेचे सचिव संतोष भंडारी,विश्वस्त राजगोपाल झंवर,
राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयाचे सचिव सुनील दावडा, डॉ सिद्धेश्वर वाले, डॉ संपत बलदवा, आसावरी सराफ, युगंधर जिंदे संतोष सपकाळ, क्षितिजा गाताडे, विजया पिटाळकर, आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, अमोल व्यवहारे, मुकेश मेहता, मणीकांत दंड, चिमण पटेल, राजीव देसाई, गुरुराज यल्लटी, संजय चौगुले, दौलत सीताफळे, बळीराम पावडे, विवेक खमीतकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार डॉ सिद्धेश्वर वाले यांनी मानले.तर सूत्रसंचालन आराध्ये यांनी केले.