मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले मनोहर जोशी यांचे निधन झाले आहेत. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली असून, मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
कोण होते मनोहर जोशी ?
मनोहर जोशी याचं जन्म 2 डिसेंबर 1937 रायगड जिल्ह्यातील नांदवी छोट्याशा गावात झाले. त्याचं शिक्षण चौथीपर्यंत नांदवीला, पाचवी महाडला, सहावीनंतर पनवेलला मामांकडे. मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करून मित्राच्या खोलीत भाड्याने राहिले. जेवणाची सोय महाजन नावाच्या महिलेनी केली. अकरावीला शिकण्यासाठी मुंबईला बहिणीकडे आले. सहत्रबुध्दे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करून शिक्षण सुरु ठेवले. किर्ती कॉलेजमधुन बी. ए. केले. पुढे मुंबई महानगरपलिकेत क्लार्कची नोकरी केली. पुढे वयाच्या 27 व्या वर्षी एम.ए., एल एल.बी. केली. दरम्यान, 1964 ला अनघा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांचा एक मुलगा व दोन मुली असा परिवार होता.
नगरसेवक ते मुख्यमंत्री
समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी यांनी 1967 साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रीय सहभागी झाले. पुढे महानगरपालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला. विशेष म्हणजे 1999 ते 2002 या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.