येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भारतात 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 20 एप्रिलपासून काही शहरांमधील नियम शिथिल करण्यात आले होते. देशभरात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही नियम शिथिल कऱण्यात आहे होते. देशभरात काही अटींवर दुकानं उघडण्यासाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री नवा आदेश काढला त्यानुसार शहरी भागात शॉप ऍक्ट नुसार नोंदणी असलेली सर्व दुकाने उघडू शकतील .या छोट्या कॉलनी, गल्लीतील दुकानांसह निवासी वस्तीत असणाऱ्या दुकानांचा ही समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयानं या संदर्भात रात्री उशिरा आदेश काढला असून आज शनिवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हा आदेश जरी काढला असला तरीही सोशल डिस्टन्सिंगचं भान नागरिकांनी खरेदी करताना आवश्यक आहे. दुकानं उघडण्यासाठी केंद्र सरकारनं ही परवानगी दिल्यामुळे देशभरातील लाखो दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा आदेश महापालिकांमधील बाजार संकुलातील दुकानांना लागू आहे. तसेच गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा आदेश हॉटस्पॉट्स किंवा कंटेनमेंट झोनमधील दुकानांसाठी लागू नसणार.
गृहमंत्रालयानं काढलेल्या आदेशानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुकानं ही आजपासून सुरू करण्यात येणार आहे. या दुकानांची सरकारकडे नोंदणी असणं आवश्यक आहे. हा नियम हॉटस्पॉट असणाऱ्या शहरांना आणि जिल्ह्यांना लागू होणार नाही. तिथे लॉकडाऊनचे नियम कठोरपणे पाळले जाणार आहे. तर मोठे शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स उघडण्यावर स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. 3 मेपर्यंत नियमाचं पालन करून नागरिकांनी खरेदी करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.