सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच घरोघरी सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये खरी माहिती द्यावी असे आवाहन सोलापूरचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी केली आहे. चार दिवसात सर्वे पूर्ण करावयाचा असून खरी माहिती दिल्यास सर्वच नागरिकांच्या फायद्याची आहे यामुळे आपल्याला हे संकट लवकरात लवकर संपवायचे आहे असेदेखील आवाहन भरणे यांनी केली आहे. जिल्हा परिषद आरोग्य खाते तसेच महापालिकेचे आरोग्य खाते सर्वेक्षणाचे काम करीत आहे .त्या प्रत्येक टीम सोबत एक डॉक्टर देणे शक्य नाही असेही त्यांनी सांगितले मात्र नागरिकांनी खरी माहिती दिल्यास योग्य वेळेत त्यांच्यावर उपचार करणे सोपे होईल असे देखील ते म्हणाले. सोमवारी किंवा मंगळवारी आपण सोलापूर शहरात येणार असून त्यानंतर पुढील नियोजन करू असे देखील त्यांनी सांगितले.