जिल्हा परिषदेत शिवजयंती, मराठा सेवा संघाचे विविध उपक्रम
सोलापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज उदयानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यांत आले तर
मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद शाखेच्या वतीने यशवंतराव सभागृहात शाहिराचा मर्दानी शिवगितींनी अंगावर शहारे आणले. पहाडी आवाजातील शिवगीतानी सभागृह दणाणून गेले.
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या वतीने रंगभवन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप मोहोळ येथील रूपेश क्षीरसागर, श्रीम. किरणकुमारी गायकवाड, एकनाथ कुंभार, महेश म्हेत्रे , परवेझ शेख, राजाराम बाबर यांना शिव गीतांचा बहारदार कार्यक्रम केल्याबद्दल सन्मानित सन्मानचिन्ह जेऊन गौरव करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक अमोल जाधव, महिला बाल विकास अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी सुलभा वठारे जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव,मराठा सेवा संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, मराठा सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ जी.के.देशमुख, दत्ता मामा मुळे, मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, उपाध्यक्ष सदाशिव पवार, जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अरुण क्षीरसागर, राजेश देशपांडे, वाय पी कांबळे, दिनेश बनसोडे विवेक लिंगराज, गिरीष जाधव, समीर शेख, योगेश हब्बु, चंद्रकांत होळकर उपस्थित होते. यावेळी स्वानंद टीचर च्या ग्रुपने शिवचरित्रावर वेगवेगळे गीते सादर करून स्फुल्लिंग चेतले. सर्वांना भगवे फेटे बांधण्यात आल्यामुळे वातावरण निर्मिती झाली. जय शिवाजी जय भवानी अशा घोषणाने वातावरण दुमदुमून गेले.
छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करा – सिईओ मनिषा आव्हाळे
शिवरायाच्या पायाच्या नखाची धुळ देखील आपण नाही. त्यांचे कार्य अतुलनीय होते. शिवरायांनी मेठे पणा साठी कधी काम केले नाही. शिवरायाचे विचार आत्मसात करा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले. शिवरायांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा. आपल्या आचरणांने व विचारांने महाराष्ट्र सक्षम ठेवणे साठी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
आजारी असूनही सिईओ आव्हाळे शिवजयंतीत रमल्या ….!
जिल्हा परिषदेच्या प्रशासक व सिईओ मनिषा आव्हाळे या आजारी असतानाही शिवजयंती सोहळ्यास उपस्थित राहून सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन अधिकारी व कर्मचारी यांचा उत्साह वाढविला. शिवगीत गाणारे कलाकार याची सन्मान करून त्यांनी प्रेरणा दिली. तोंडाला मास्क लावून भाषण करताना त्यांना त्रास होत होता तरीही त्यांनी सक्षमपणे सर्वाना छत्रपती शिवरायांचे प्रेरणादायी कार्य सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन वाघमारे, आदम मन्सुर नाईक,सचिन चव्हाण, अनिल जगताप, म.ज. मोरे, सचिन साळुंखे, राम जगदाळे, अजीत देशमुख सचिन चवरे, सुधाकर माने देशमुख, नितीन चेतन भोसले, विशाल घोगरे, रोहीत घुले, अनिल पाटील, संजय चव्हाण, सचिन पवार, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, भूषण काळे, विठ्ठल मलपे, संतोष शिंदे, विकास भांगे, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले, रणजीत गव्हाणे,गणेश साळुंखे, महेंद्र माने, उमेश खंडागळे, विनायक कदम, प्रदिप सुपेकर, आनंद साठे, जयवंत जाधव, संतोष नीळ, अशोक मोरे, प्रकाश शेंडगे, अभिजीत निचळ , देशमुख, राजाराम रणवरे, गिरीष धुमाळ, सुनिता भुसारे, अश्विनी सातपुते, अनुपमा पडवळे, ज्योत्स्ना साठे, भारती धुमाळ, सविता मिसाळ अर्चना निराळी, अनिता तुपारे, छाया क्षिरसागर यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. प्रास्तविक मराठा सेवा संघाचे जि प शाखेचे जिल्हाधक्ष अनिनाश गोडसे यांनी मानले.आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले.
पहाडी आवाजातील शिवगीतानी जिल्हा परिषद सभागृह दणाणले..!
स्वानंद टीचर च्या ग्रुपने शिवचरित्रावर वेगवेगळे गीते सादर करून स्फुल्लिंग चेतले. महाराष्ट्र गीता बरोबर त्यांनी शिवरायांवरील गीते सादर केली. शिवरायांचा पाळणा, जिजाऊ गीत, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. वेडात मराठे वीर दौडले…. अशा शिव गितांनी कार्यक्रमात जान आणली. पहाडी आवाजातील शिवगीतानी जिल्हा परिषद सभागृह दणाणून गेले. कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.