सोलापूर : सोलापूर साठी तिसऱ्यांदा पालकमंत्री बदलण्याची वेळ शासनावर आली आहे .त्यामुळे सोलापूरला पालकमंत्री धार्जिन नसल्याचे दिसून येते. सुरुवातीला दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती केली त्यांची नियुक्ती तीन महिन्यांनी रद्द करून त्या ठिकाणी गेल्या महिन्यात जितेंद्र आव्हाड यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली. त्यांनी सोलापुरात येऊन एकच बैठक घेतली आणि तेच सध्या कोरोना मुळे अडचणीत आले आहेत .त्यामुळे आता तिसऱ्यांदा पालकमंत्री बदलले आहेत.आमदार दत्ता भरणे यांची सोलापूरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे .आज दुपारी त्यांची ऑर्डर निघाली आहे. सध्या सोलापूर शहरातील कोरोनाबादीताची संख्या वाढत असून जिल्हा प्रशासनाला धीर देण्यासाठी शिवाय शासन दरबारी आणि प्रश्न मांडण्यासाठी तातडीने पालकमंत्री नियुक्त करावा अशी मागणी होत होती. नवे पालकमंत्री दत्ता भरणे उद्या सोलापुरात येऊन बैठक घेणार आहेत.