सोलापूर – उत्सवप्रिय सोलापूरला शिस्त आणि संस्कृतीची जोड परम वैभवी करेल असा विश्वास पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ ने आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लब च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा या होत्या.
आपण आनंद द्विगुणित करावा आणि तो आल्हाददायक असावा असे ते म्हणाले. डॉल्बी नाही तर पारंपरिक वाद्ये ही आपली संस्कृती आहे याचा सर्वत्र गांभीर्यपूर्वक विचार करणे आवश्यक आहे असे ही ते म्हणाले. केवळ आपण साक्षर असून उपयोग नाही तर संस्काराने सुशिक्षित होणे अत्यंत गरजेचे आहे. सुसंस्कारित समाजाचा दबावगट आवश्यक आहे. तोच हे परिवर्तन घडवून आणू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांनी सोलापूरची ओळख आणि गौरवपूर्ण परंपरा सांगितली.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय रोटेरियन दीपक आरवे यांनी करून दिला . क्लबच्या अध्यक्षा डॉ माखिजा यांनी प्रमुख पाहुण्यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन रोटेरियन सुनील दावडा यांनी केले.
या कार्यक्रमास क्लबचे सचिव स्वप्नील कोलगुंडे, रोटेरियन सुनील दावडा, डॉ सुनील वैद्य, डॉ सचिन जम्मा , डॉ वाले, युगंधर जिंदे, डॉ बाळासाहेब शितोळे, डॉ ललिता शितोळे, राजीव देसाई, स्वप्नील शेठ, संजय चौगुले, दौलत सीताफले, विवेक खमीतकर, आसावरी सराफ, क्षितिजा गाताडे, गंगाधर मदभावी आदी उपस्थित होते.