सोलापूर दि. 20 : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काही खासगी डॉक्टरांच्या सेवा श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ( सिव्हील हॉस्पिटल) येथे वर्ग करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सांगितले. याबाबत त्यांनी आज आदेश जारी केले आहेत.
सिव्हील हॉस्पिटलकडे शहरातील विविध क्षेत्रातील 27 वैद्यकीय व्यवसायिकांची सेवा वर्ग करण्यात आल्या आहेत. यामध्ये सात कार्डीओलॉजिस्ट, चार गॅस्ट्रोएंटरलॉजिस्ट, पाच नेफ्रोलॉजिस्ट, सहा न्युरॉलॉजिस्ट आदींचा समावेश आहे.
या डॉक्टरनी सिव्हील हॉस्पिटल येथील फिव्हर ओपीडी, मेडिसीन ओपीडी आणि मेल-फिमेल मेडिकल वॉर्ड मध्ये सेवा बजावयाची आहे. या सर्व डॉक्टरनी वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या सूचनांनुसार काम पाहायचे आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे सोलापूर अध्यक्ष डॉ. हरिश रायचूर यांना याबाबत समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असे याबाबत जारी केलेल्या आदेशात श्री. शंभरकर यांनी नमूद केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे सेवा घेण्यात आलेल्या डॉक्टरर्सची माहिती पुढीलप्रमाणे :- 1) कार्डीओलॉजिस्ट – डॉ. रिझवाज हाक, डॉ. गुरुनाथ पारळे, डॉ. अमजद सय्यद, डॉ. शैलेश पाटील, डॉ. अनुपम शहा, डॉ. सत्यशाम तोष्णीवाल, डॉ. राहुल सोमाणी, 2) गॅस्ट्रोएंटरलॉजिस्ट- डॉ. सुजित जहागीरदार, डॉ. सुर्यप्रकाश कोठे, डॉ. तोटला, डॉ. अमोल पाटील, 3) नेफ्रोलॉजिस्ट- डॉ. संदिप होळकर, डॉ. नील रोहित पाईके, डॉ. गजानन पिलगुलवार, डॉ. कोलूर, डॉ. मालू 4 ) न्युरॉलॉजिस्ट – डॉ. सचिन बांगर, डॉ. अश्विन वळसंगकर, डॉ. प्रसन्न कासेगावकर, डॉ. अशिष भुतडा, डॉ. आनंद मुदकना, डॉ. पी. एम कुलकर्णी 5) पुल्मोनोलॉजिस्ट – डॉ. लतिफ शेख, डॉ. फिरोज सय्यद, डॉ. आमले. 6) एंडोक्रीनोलॉजिस्ट – डॉ. पुनम बजाज आणि डॉ. हर्षल काकडे.