येस न्युज नेटवर्क : दि.६ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत दिल्लीतील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जलतरण तलाव संकुल येथे १ ली BIMSTEC एक्वाटिक्स चॅम्पियनशिप २०२४ संपन्न झाली. या स्पर्धेत डायविंग या क्रीड़ा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करताना सोलापुरच्या इंडियन मॉडेल स्कूलमध्ये इयत्ता १० वीत शिकणाऱ्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हीने हायबोर्ड मध्ये २३४.०० गुणासह सिल्वर मेडल, ३ मीटर स्प्रिंगबोर्ड मध्ये २४२.३५ गुणासह गोल्ड मेडल, तर १ मीटर स्प्रिंगबोर्ड मध्ये २०९.७५ गुणासह ब्रोंज मेडल पटकावले असून, यामुळे भारताला १ली BIMSTEC डाइविंग-वुमेन टीम चैम्पियनशिप प्राप्त झाली आहे.
यासाठी तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्री.श्रीकांत शेटे सर, रेल्वे कोच भाऊसाहेब दिघे सर, ASI कोच कुंजकिशोर मेलम सर, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. श्रावणीचा हा आलेख असाच वाढत रहावा यासाठी डायव्हिंग फिना जज्ज फिना रेफरी श्री.मयुरजी व्यास सर, SFI जनरल सेक्रेटरी श्री. मोनलजी चोकशी सर, SFI सर्वेसर्वा श्री.कमलेशजी नानावटी सर यांनी श्रावणीला आशीर्वाद देऊन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले.