सोलापूर, दि. 18- कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्ह्याकरीता कोव्हीड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी विविध 43 ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी सहा इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पंढरपुरातील तीन हॉस्पिटलचा समावेश आहे. कोव्हीड केअर सेंटर म्हणून पंचवीस आणि डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर म्हणून बारा हॉस्पिटल निश्चित करण्यात आली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल उशिरा आदेश जारी केले आहेत.
कोव्हीड केअर सेंटर इमारती आणि तेथील उपलब्ध बेड संख्या – श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट (200), श्री. स्वामी समर्थ भक्त निवास, अक्कलकोट (239), श्री. साई आयुर्वेदीक महाविद्यालय, वैराग (550), यशवंतराव चव्हाण, महाविद्यालय, करमाळा (250), महात्मा गांधी विद्यालय, करमाळा (50),अण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा (80), संकेत मंगल कार्यालय, माढा (150), रामानंद स्वामी मंगल कार्यालय, माढा (150). आदी लक्ष्मी मंगल कार्यालय, माढा (152), उपविभागीय अभियंता, भीमा कालवा निवासस्थान, मोहोळ (388), प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत, महाळूंग, ता. माळशिरस (150), गुरुकृपा मंगल कार्यालय, तांबवे, ता. माळशिरस (100), आनंदी गणेश मंगल कार्यालय, आनंदनगर, ता. माळशिरस (120), अक्षता मंगल कार्यालय , माळशिरस (120), सगुण स्वामी मंगल कार्यालय, तांदूळवाडी, ता. माळशिरस (140), मधुमिलन मंगल कार्यालय, नातेपूते, ता. माळशिरस (100), मदनसिंह मोहिते-पाटील इंग्लीश मिडीयम स्कूल, मंगळवेढा (168), संद दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा (176), श्रीराम ग्रामिण संशोधन विकास प्रतिष्ठान होस्टेल नान्नज, ता. उ. सोलापूर (147), एमआयटी इन्स्टीटयूट, पुणे रोड, पंढरपूर (300), स्वेरी इंजीनिअरींग व फार्मसी कॉलेज, गोपाळपूर, पंढरपूर (317), सांगोला महाविद्यालय, कडलास रोड, सांगोला (165), प्राथमिक आरोग्य केंद्र, गेडशिंगी, ता. सांगोला (50), शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, कडलास रोड, सांगोला (260) आणि महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नोलॉजी, सोलापूर (338).
डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर म्हणून बारा हॉस्पिटल निश्चित करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर वैद्यकीय मनुष्यबळ आणि ऑक्सिजन पुरविणारी यंत्रणा आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे, कंसात उपलब्ध बेड संख्या- संत लुकास हॉस्पिटल नान्नज, ता. उत्तर सोलापूर (50), श्री. स्वामी समर्थ रुग्णालय, अक्क्लकोट (200), साखरे हॉस्पिटल कुर्डूवाडी (59), देवडीकर मेडीकल सेंटर, अकलुज (25), कदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, अकलूज (50), संजीवनी हॉस्पिटल, एस.टी. स्टॅण्ड जवळ, मंगळवेढा (25), श्री. संत दामाजी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, मंगळवेढा (25), ग्रामीण रुग्णालय जेऊर, ता. करमाळा (50), दक्षता हॉस्पिटल, सांगोला (62), डॉ. सुनील लवटे हॉस्पिटल, सांगोला (30), डॉ. राजेश बाबर हॉस्पिटल, वाढेगाव नाका, सांगोला (33), श्री. विठ्ठल हॉस्पिटल, पंढरपूर (120).
डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून सहा ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे, कंसात उपलब्ध बेड संख्या- आश्विनी रुरल मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल, कुंभारी (100), अकलूज क्रिटी केअर हॉस्पिटल , अकलूज (50), एसएसपी संचलीत जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी (300), जनकल्याण हॉस्पिटल, पंढरपूर (100), लार्हफ लाईन हॉस्पिटल , पंढरपूर (108) आणि अपेक्स हॉस्पिटल, पंढरपूर (100).