विशाखापट्टणम : भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला 106 धावांनी लोळवून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताकडून दुसऱ्या डावातही जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने भेदक गोलंदाजी करत, इंग्लंडच्या फलंदाजाना गुंडाळण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. दुसऱ्या डावात बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताच्या 399 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा दुसऱा डाव 292 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने चौथ्या दिवशीच ही कसोटी आपल्या खिशात टाकली.