यंदाचा अर्थसंकल्प हा उद्योगस्नेही (इंडस्ट्री फ्रेंडली) अर्थसंकल्प आहे असे म्हणता येईल. रिसर्च आणि इनोव्हेशनला वाव देणारा आहे. त्यासाठी मोठ्या निधीची म्हणजे एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली आहे. एक लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करुन युवकांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय अतिशय क्रांतीकारी आहे. यातून मोठ्या प्रमाणात नवीन उद्योजक तयार होतील. यातून संशोधनाला आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मोठी चालना मिळेल. तसेच इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी 50 वर्षांसाठी एक लाख कोटी विना व्याज कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते.
यतिन शहा, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, प्रिसिजन कॅमशॉफ्ट लिमिटेड