सोलापूर : सोलापूरच्या भारतरत्न इंदिरा नगर भागातील ६९ वर्षीय महिलेचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु वास्तव कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. या महिलेच्या संपर्कात आठ व्यक्ती आल्याने त्यांना तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे ७० फूट रोड, कुमठानाका, गेंटयाल टॉकीज हा परिसर सील करण्यात आला आहे. आजवर ७१८ लोकांना आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते यापैकी ५०५ जणांचे रिपोर्ट आले असून ४९० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आणि १५ जणांचे रिपोर्ट पॉसिटीव्ह आले आहेत असेही जिल्हाधिकारी म्हणाले. सोलापुरात आजवर कोरोना पॉसिटीव्हचे एकूण १५ रुग्ण आढळले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर १३ जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.