- मोहिते-पाटील यांनी मांडल्या कारखानदार,शेतकरी,कामगार वर्गाच्या व्यथा …
सोलापूर : राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विडीओ काँफरन्सींग द्वारे रणजितसिंह मोहीते पाटील यांच्याशी संवाद साधुन लोकडाउन काळातील सहकार व अन्य क्षेत्रातील अडचणींचा आढावा घेतला या वेळी रणजितसिंह मोहीते पाटील यांनी,लोकडाउनच्या काळात सहकारी व खासगी साखर कारखानदारी अडचणीत आलेली असुन साखर कारखाण्यांकडे साखर भरपुर प्रमाणात पडुन आहे दळणवळणाच्या अडचणींमुळे व्यापारी उपलब्द होत नसल्याने ती उचलली जात नाही तर ती साखर फुड काॅर्पोरेशन आॅफ इंडीयाने विकत घेतली पाहीजे. ज्या कारखाण्याकडे ईथेनाॅल उपलब्द आहे ते आॅल कार्पोरेशन आॅफ इंडीयाने विकत घेवुन ते स्टोअर करुन ठेवले पाहीजे.ज्या द्वारे कारखानदारांकडे पैसे उपलब्द होवुन ते ऊस उत्पादक शेतकर्यांना देता येतील.
सरकारने सहकारी दुध संघाकडील अतिरीक्त दुधाची दुध पावडर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आज ग्रामीण भागात खासगी दुधसंस्थांची संख्या मोठी आहे पण या अडचणीच्या काळात खासगी दुध संस्थाकडे अतिरीक्त दुधाची विल्हेवाट लावण्याची सोय नाही त्यामुळे दुध उत्पादक शेतकर्यांना मिळणाना दुधाचा भाव पडला आहे शेतकर्यांकडुन खासगी दुध संस्था१५ ते २०रुपये लिटर प्रमाने दुध खरेदी करत आहेत त्यामुळे ऐन अडचणीच्या काळात दुध उत्पादक शेतकर्यांच मोठं नुकसान होत आहे. त्यासाठी सरकारने खासगी दुध संस्थांकडुन दुध खरेदी करुन त्यापासुन देखील दुध पावडर बनवली पाहीजे जी आपत्कालीन परीस्थितीमधे उपयोगाला येईल.आज शेतकर्यांच्या शेतमालाला भाव नाही लोकडाऊन मुळे शेतकरी पुर्णतः कोलमडला आहे.उदाहरणा दाखल आज मका या पीकाचा हमीभाव १७६० रुपये प्रति क्विंटल असताना ती १३००-१४०० रुपये प्रतिक्किंटल खरेदी केली जात आहे यातुन नेतकर्यांच नुकसान होत असुन त्यासाठी शेतकर्यांचा शेतमाल हमीभावाने विकला पाहीजे त्यासाठी आपत्कालीन परीस्थितीमधे शेतमाल खरेदी विक्रीसाठी राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने आॅनलाईन खरेदी विक्री आॅप बनवले पाहीजे ज्याचा लाभ शेतकर्यांसाठी होवु शकेल.
आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात असंघटीत कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे.कामगार मंत्रालयाकडे यासंदर्भात निधीही उपलब्द आहे त्याचा या अडचणींच्या काळात उपयोग होऊन असंघटीत कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न सोडवला पाहीजे.आशा प्रकारचे प्रश्न जे शेतकरी, कामगार यांच्या दैनंदिन जिवनाशी निगडीत आहेत त्या प्रश्नांकडे बोट दाखवत ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागले पाहीजेत अशी मागनी रणजितसिंह मोहीते पाटील यांनी विडीओ काँफरंन्सीग द्वारे देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेदवारे केली आहे.