सोलापूर : सोलापूर शहरात कोरोना वाढत असून मुलांनो तुम्ही एकत्र खेळू नका असे सांगणार्या मार्कंडेय रुग्णालयातील स्टाफ नर्स आणि त्यांच्या पतीच्या गाड्या जाळल्याची घटना सोलापुरात घडली आहे. सुरेखा पुजारी असे स्टाप नर्सची नाव असून त्यांची गाडी क्रमांक एम एच 13- 61 55 मेस्ट्रो आणि त्यांच्या पतीची गाडी क्रमांक एम एच 13 सी 4213 हिरो होंडा या दोन्ही गाड्या त्या समाजकंटकांनी काल रात्री जाळल्या. सदरची महिला ही कुंभारी येथील विडी घरकुल मध्ये 817/4 या ठिकाणी राहत असून पोलिसांनी कुंभारी पोलिस चौकीमध्ये तिने तक्रार केल्यानंतर देखील दुपारी दुर्लक्ष करण्यात आले. कोणीही पोलीस आले नाहीत त्यामुळे रात्री ही घटना घडली.
सदर महिलेच्या घरासमोर मोकळ मैदान असून याठिकाणी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दहा ते बारा मुले खेळत होती. आपल्याकडे बारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत आता तरी खेळू नका असे त्या महिलेने दुपारी सांगितले मात्र तू दररोज मार्कंडेय हॉस्पिटल ला जाते तुझ्यामुळे कोरोना येत नाही का असं सांगत तुला बघून घेतो अशी दमदाटी काही समाजकंटकांकडून करण्यात आली आणि रात्री गाड्या जाळण्याचे हे कृत्य केले याबाबत सदर महिलेने कुंभारी पोलीस चौकी मध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी तिला वळसंग येथे जाऊन तक्रार देण्यास सांगितले आहे.