सोलापूर : जुळे सोलापूर भागातील प्रभाग २६ मध्ये अनेक नगरामध्ये नागरिकांच्या समस्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेज, पाण्याच्या पाईपलाईन, अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात महापालिकेत प्रशासक असल्यामुळे निवेदन देऊन काहीच उपयोग होत नसल्यामुळे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी समक्ष भेटून निवेदन दिले व समस्या सांगितल्या.
खालील नगरांचा कायापालट होणार. तसेच मंजूर डीपी रस्ते केंद्र शासनाच्या धूळ मुक्त योजनेअंतर्गत घेतल्याने प्रभाग २६ मधील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले रस्त्याचे प्रश्न मार्गी लागतील त्यामुळे नागरिकांचे जटिल प्रश्न सोडवता येईल व भविष्यात भाजपा पक्षाला पोषक वातावरण निर्माण होईल अशी विनंती पालकमंत्र्यांना करण्यात आली त्यावेळी त्यांनी सदर कामे प्राधान्याने घेण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.
त्यामुळे प्रभाग 26 मधील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले कामे लवकरात लवकर करावे अशी विनंती भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी निवेदन दिले आहे व त्यासाठी पाठपुरावाही चालू केला आहे. त्यामुळे प्रभाग 26 मधील नागरिकांच्या अनेक समस्या सुटणार एवढे मात्र नक्की.
प्रभाग 26 मधील खालील नगरांचा कायापालट होणार
कोरे वस्ती, शाहूनगर, राऊत वस्ती, वास्तू विहार नगर,ए.जी. पाटील नगर, परमेश्वर नगर, कल्याण नगर भाग एक, दोन, तीन, समर्थ नगर, मीना नगर, बंडाप्पा नगर, सुभाष शहा नगर, रत्नमंजिरी नगर, गुरुदेव दत्त नगर १ ते ६, रोहिणी नगर भाग एक, द्वारका नगर, शिक्षक सोसायटी ओम गर्जना चौक, ज्योती नगर, गंगाधर नगर, गणेश बिल्डर सोसायटी, अभिषेक नगर,रामनारायण चंडक विहार, राघवेंद्र नगर,अमर नगर सोरेगाव, बहुरूपी नगर सोरेगाव, गजानन नगर एस आर पी कॅम्प जवळ, रेणुका नगर, रजनीश रेसिडेन्सी, समर्थ सोसायटी एस आर पी कॅम्प जवळ, प्रियांका नगर,प्रल्हाद नगर,आयोध्या नगर,अश्विनी कॉलनी सोसायटी. या नगरामध्ये ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन,अंतर्गत रस्ते. प्राध्यान्याने सन 23-24 शासनाच्या महत्वकांक्षी नगरोस्थान योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देणे बाबतनिवेदन दिले आहे.
तसेच प्रभाग २६ मधील मंजूर लेआउट डीपी प्रमाणे मंजूर रस्ते मधील रेणुका नगर येथील भीमाशंकर अपार्टमेंट ते उधव नगर भाग १ प्लॉट नंबर 18 गदगी घरापर्यंत रस्ता करणे.
प्रभाग २६ ब मधील आर्यन वर्ल्ड स्कूल ते रेणुका नगर जवळील भीमाशंकर अपार्टमेंट येथे डांबरी रस्ता करणे.
प्रभाग २६ ब मधील रेणुका नगर भीमाशंकर अपार्टमेंट,कृष्णा बाग, साक्षी नगर,उद्धव नगर,रेणुका नगर,बंडे नगर,दत्ततारा पार्क, प्रल्हाद नगर,प्रियंका नगर,रजनीश रेसिडेन्सी पार्क, आदित्य रेसिडेन्सी, विश्व नगर,शिवभारत पार्क, चंडक मळा ते विजापूर रोड हायवे टच डीपी रस्ता मंजूर असून सदर रोड डांबरीकरण बाबत.
प्रभाग २६ ब मधील आर्यन वर्ल्ड स्कूल ते रेणुका नगर प्लॉट नंबर 712 ते कटगिरी सर प्लॉट नंबर 671 सर्वे नंबर 99/1/ ब येथे डीपी रस्ता मंजूर असून डांबरी करणे बाबत.
प्रभाग २६ ब मधील रेणुका नगर प्लॉट नंबर 520 ते रेणुका नगर प्लॉट नंबर 16 पर्यंत डीपी रस्ता मंजूर असून त्या ठिकाणी डांबरी रस्ते करणे बाबत.
तसेच शासनाच्या २०२३ -२०२४ अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत प्रभाग 26 ब मधील सोरेगाव जवळील स्वस्तिक नगर व किसान नगर येथे अंतर्गत रस्ते, ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन, दिवाबत्ती करणे बाबत.
प्रभाग २६ ब मधील विश्व नगर चंडक मळा येथे अंतर्गत ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन, रस्ते,दिवाबत्ती करणे.
प्रभाग 26 ब मधील पाटलीपुत्र नगर येथे अंतर्गत ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन, रस्ते, दिवाबती करणे.
वरील सर्व कामासाठी सदैव जनतेच्या सेवेत असणाऱ्या भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी शासन दरबारी पाठपुरावा चालू केला असून लवकरच प्रभाग २६ चा अति जलद कायापालट होणार.