- शंभर प्रकारचे नमुने एकाच प्रदर्शनात
- प्रदर्शन १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान फॉरेस्ट येथील अग्रवाल राईस मर्चंट येथे सुरू
सोलापूर : सोलापूर येथील सुप्रसिद्ध राईस किंग अग्रवाल बंधू यांचे तांदूळ प्रदर्शन मोठ्या थाटामाटात सुरू झाले. 25 वर्षापासून या तांदूळ महोत्सवाला तेवढ्याच उत्साहाने ग्राहक प्रतिसाद देत असतात असे मत दिनेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.
राईस किंग अग्रवाल बंधू यांच्या या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन फॉरेस्ट येथील महापौर बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या अग्रवाल राईस मर्चंट येथे संपन्न झाले. याचे उद्घाटन श्रीमती मंजू रमेश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सतीश अग्रवाल, जयेश भाई गोगरी, आकाश गोगरी डॉक्टर पुष्पा अग्रवाल, लक्ष्मीचंद अग्रवाल विनोद अग्रवाल, डॉक्टर हिरालाल अग्रवाल, आदी उपस्थित होते.
हे प्रदर्शन दिनांक 15 ते 19 जानेवारी दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहील. या प्रदर्शनात बासमती तांदूळ यामध्ये तिबार, दुबार, मिनी दुबार, मोगरा,आंबेमोहोर, कालीमुच, चींनुर, इंद्रायणी तसेच बिनवासाचे तांदूळ म्हणजे कोलम, एचएमटी, सोना मसुरी, मसुरी अशा विविध प्रकारचे शंभर तांदळाचे नमुने असलेले तांदूळ या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाची प्रस्तावना सतीश अग्रवाल यांनी केले तर आभार दिनेश अग्रवाल यांनी मानले याचे सूत्रसंचालन भारत उदगिरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण अग्रवाल परिवार यांनी प्रयत्न केले.