सोलापूर :- कोरोणा या महामारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रामध्ये कोरोणा पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे महापालिकेच्या माध्यमातून कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि सोलापूर नगरसेवक ,नगरसेविका यांना नागरिकांकडून आलेल्या सूचना या बैठकीमध्ये पदाधिकारी व गटनेते यांच्या माध्यमातून महापालिका प्रशासन यांच्यामध्ये संयुक्त बैठक घेणे आवश्यक असून सोशल डिस्टन्स चा आधार घेऊन महापालिकेच्या हिरवळीवर तातडीने बैठक घेणे बाबत माननीय महापौर सौ.कांचना यन्नम यांना बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे उपस्थित होते.