संपूर्ण देशाचा आर्थिक कणा असलेल्या वाहतूक सेवांमध्ये कोट्यावधी वाहनचालक आपली सेवा अहोरात्र बजावतात. असंघटित क्षेत्रात कार्यरत लाखो वाहनचालक आपल्या तुटपुंज्या पगारावर आपल्या कुटूंबियांची गुजराण जीव धोक्यात घालून करतात. सद्यस्थितीत वाहनचालकांना आपली सेवा बजावत असताना बेशिस्त वाहतूक, खराब रस्ते सारख्या अनेक अडचणींना तोंड देत आपली कर्तव्यपूर्ती वेळेत करावी लागते. रस्त्यांवरील अपघातांचे वाढत्या संख्येनुसार अपघातस्थळी वैद्यकीय मदत मिळण्यास बराच उशीर होऊन मृत्यूचे प्रमाण वाढते.
अनेकदा अपघातस्थळी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याऐवजी वाहनचालकांना प्रथम दोषी मानून प्रसंगी गर्दीमध्ये सामूहिक मारहाणही केली जाते. मारहाणी दरम्यान जीवितास होत असलेला धोका ओळखता अपघातस्थळापासून दूर जावे लागते अन्यथा मॉब लीचिंग सारख्या घटनेमध्ये बळी जातो. नुकताच केंद्र शासनाने हिट अँड रन हा जाचक कायदा मंजूर केला असून त्यानुसार ७ लाख रुपयांपर्यंत दंड आणि १० वर्ष जेल अशा शिक्षेची तरतूद केली आहे. संपूर्ण देशातील असंघटित क्षेत्रातील तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या वाहनचालकांना अपघातप्रसंगी दोषी आढळल्यास लाखोंचा दंड व दहा वर्ष शिक्षा अव्यहार्य आणि जाचक असून वाहनचालकांवर अवलंबून असणारे कुटुंब कर्ता व्यक्ती शिक्षा भोगत असल्याने रस्त्यावर येणाची दाट शक्यता आहे. तरी केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेला अन्यायकारक हिट अँड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी संभाजी आरमार च्या वतीने मार्केट यार्ड चौकात शेकडो वाहन चालकां समवेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी वाहन चालक वर लादलेला जुलमी कायद्या विरोधात संभाजी आरमार ने पुढाकार घेतला असून वाहन चालकांच्या न्यायाहक्का साठी वाहन चालक कल्याणकारी मंडळ सरकने स्थापन करावे जेणेकरून वाहन चालक बांधवांच्या लेकरांच्या शिक्षण आरोग्य सुविधा मिळाव्यात अपघातात जमावा कडून ड्रायवर चा मृत्यू झाल्यास त्याला एक कोटीची मदत त्याच्या कंटुबाला द्यावी अशी मागणी करत जर हा कायदा रद्द न झाल्यास वाहन चालकांच्या हक्काच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढू असे प्रतिपादन केले.
संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, शहरप्रमुख सागर ढगे,शहरउप्रमुख राज जगताप, विभागप्रमुख व्दारकेश बबलादीकर, स्वप्निल ईराबत्ती, गुरूनाथ औंरग,संभाजी आरमार वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजेश पाटील,फैय्याज नगरवाले, शकील शेख, हजरत शेख,सिद्धाराम संगोळगी, संतोष खानापुरे, भास्कर भोसले, बंदेनवाज पठाण ,यांच्यासमेवत अनेक वाहन चालक मोठ्या संख्येने सामील झाले होते.