मुंबई : अयोध्येतील भगवान श्रीरामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवण्याची संधी देशातील काही मोजक्याच विशेष व्यक्तींना मिळणार आहे. विविध क्षेत्रांतील निमंतित्रांना सोहळ्याच्या पत्रिका देण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील सात प्रमुख नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून ठाकरे बंधूना निमंत्रण देण्यात आले आहे. तर शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुखांना निमंत्रण देण्यात आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून ही पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण देण्यात आलेले आहे. लवकरच इतर पक्षप्रमुखांना निमंत्रण पाठवले जाणार आहे. महराष्ट्र वगळता इतर राज्याचा विचार केला असता एम. के. स्टॅलिन, लालुप्रसाद यादव, मायावती यांना देखील निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.
निमंत्रीत करण्यात आलेल्यांची यादी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर
रिपाई खासदार रामदास आठवले
उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे