मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 10 जानेवारीला बुधवारी दुपारी 4 नंतर लागणार निकाल लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचं समजतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 जानेवारीपर्यंत निकाल देणं अनिवार्य होते.
विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरु आहे. निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहे. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे. शिवसेनेतल्या आमदार अपात्रतेवर चार महिने सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 10 जानेवारीला महत्त्वाचा निकाल देणार आहेत.. त्यामुळे नार्वेकरांचा काय फैसला येणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांचा निकाल तयार असल्याचीही माहिती आहे. या निकालपत्राच्या मसुद्यावर दिल्लीतील कायदेतज्ज्ञांचाही अभिप्राय घेण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी 7 जानेवारीला वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यावर ठाकरे गटाकडून जोरदार टीकाही करण्यात आली आहे.