- सोलापूरकर टेन्शनमध्ये ! कोरोनाचा बळी ठरलेल्या ‘त्या’ व्यक्तीला लागण झाली कशी…?
सोलापुरातील पहिला कोरोनाचा बळी ठरलेला तो व्यक्ती 23 मार्च पासून त्याच्या पाच्छा पेठेतील किराणा दुकानातच होता. तो तब्बलकीला देखील गेला नव्हता. त्यामुळे त्या व्यक्तीला कोरोना ची लागण कोणामुळे झाली ? याबाबत आता आरोग्य यंत्रणा खडबडून विचार करू लागली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या 85 नातेवाईकांना आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले आहे. हा व्यक्ती किराणा दुकानदार असल्यामुळे आणखी कोण कोण त्यांच्या संपर्कात आले याचे आता सोलापूरकरांनी टेन्शन घेतले आहे.
- पाच्छा पेठेतील सुमारे 8 हजार लोकांची घेणार माहिती..!
सोलापूरच्या पाच्छा पेठ भागात कोरोनामुळे एका दुकानदाराचा मृत्यू झाल्याने या परिसराला सील करण्यात आले आहे .महापालिका आणि आरोग्य खात्याच्या वतीने या परिसरातील सुमारे आठ हजार लोकांची घरोघरी जाऊन माहिती घेण्यात येणार आहे.
- सोलापूरच्या पाच्छा पेठेतील सुमारे पाच किलोमीटर परिघात नो एन्ट्री
कोरोनामुळे पाच्छा पेठेतील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे या परिसरात महापालिकेने सॅनीटायजेशन सुरू केले आहे. या परिसराकडे जाणारे सर्व रस्ते बॅरीगेटिंग लावून बंद करण्यात आले आहेत. मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस ,बेगम पेठ पोलीस चौकी आदी परिसरातून पाच्छा पेठेकडे जाणारे तसेच जोडबसवण्णा चौक बालाजी मंदिर , येथून येणारे सर्व रस्ते बंद केले आहे.
- होम मैदानावरील भाजी मार्केटमध्ये पुन्हा सोशल डिस्टन्स बोऱ्या
होम मैदानावरील भाजी विक्रेत्यांकडून सोशल डिस्टन्सचा बोऱ्या वाजला जात आहे. या ठिकाणी सोमवारी देखील सुमारे चारशे लोक एकत्र दिसत होते.
- बँकांमध्ये पुन्हा पाचशे रुपये काढण्यासाठी रांगा
शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी बँक सुरू झाल्यामुळे आणि बँकाच्या वेळा सोलापुरात सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंत असल्यामुळे सोमवारी सकाळी बँकांच्या समोर पुन्हा पाचशे रुपये काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
- राज्यात आज नवे 82 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजार पार
राज्यात आज नवीन 82 रुग्ण वाढले, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजार पार गेला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची आकडा २०६४ वर पोहचला असून आतापर्यंत १४९ जणांनी आपला जीव गमावला आहे.
- सोलापुरात सहा निवारा केंद्रात 14 राज्यातील 650 लोक
सोलापूर शहरात परप्रांतातील सुमारे 650 लोक अडकले असून त्यांना महापालिकेच्या सहा निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना नाश्ता जेवण आधी सुविधा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महापालिका करत आहे. महापालिका नगर अभियंता विभागाची टीम यांच्यासाठी काम करत आहे.