सोलापूर : कोरोना मुक्त असलेल्या सोलापूर शहरात आज कोरोना ने एकाचा बळी घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.कोरोना बाधित 56 वर्षीय मृत्यू झाल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. त्याचा तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर त्याचे स्वॅब कोरोना पाझिटीव्ह आला आहे.
10 एप्रिल रोजी पहाटे त्याला उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 11 एप्रिल रो7जी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली पाच-सहा पेठ परिसरातील एक किलोमीटर परिसर सील करण्यात आला असून याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी व पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत