सोलापूर : सध्या महापालिकेकडून निराळे वस्ती ते अरविंद धाम अवंती नगर भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेजचे काम चालू असल्यामुळे तो रस्ता बंद करण्यात आला आहे. त्या परिसरातील लोकांना हॉटेल अँबेसिडर शरद पवार हायस्कूल या रस्त्याने जावे लागत होते परंतु शरद पवार हायस्कूल जवळ ड्रेनेजचे काम झाल्यामुळे रस्ता खचल्याने मोठमोठे खड्डे पडले होते.
अनेक वाहनधारक, महिला वर्ग यांना त्रास होत असले बाबत त्यांनी भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली होती. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी संबंधित अधिकारी व सोलापूर महानगरपालिका ब्रेकिंग ग्रुपवर व आयुक्त यांना सदर रोडच्या समस्या बाबत माहिती दिली होती. महापालिकेकडून तातडीने सदरचा रोड दुरुस्तीसाठी सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे अवंती नगर,अरविंद धाम व परिसरातील भागातील लोकांना सदर रोड वरील खड्डे पडलेले त्रासापासून सुटका झाली. याबद्दल माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण व दैनिक जनसत्य यांचे त्या परिसरातील लोक आभार मानत आहेत.