माहिती व प्रसारण मंत्रालयाचा लॉकडाऊन पर्यंत उपक्रम
सोलापूर : घरी राहा, सुरक्षित राहा, आरोग्यदायी राहा असा संदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सोलापुर येथील क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरोच्यावतीने शहर व जिल्हयामध्ये पाच मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून देऊन जनजागृती करणेत येत आहे. देशामध्ये व राज्यामध्ये मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे.
दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत.यावरती प्रभावी उपाय म्हणजे जनतेने घरामध्ये राहणे आवश्यक आहे. दि. १४ एप्रिल २०२० पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. जिवनावश्यक गोष्टी व मेडीकल व अत्यावश्यक सेवा शिवाय कोणीही घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात येत आहे. सदरील वाहनाच्या माध्यमातून पोलिस अधिकारी फेरी काढून जनतेमध्ये संदेश देत आहेत. घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचा अधिक प्रसार होईल म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी असा संदेश देण्यात येत आहे.
सदरील पाच मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून सोलापुर शहरासह सर्व तालुक्यामध्ये जनजागृती अभियान खालील प्रमाणे राबविण्यात येणार आहे. दिनांक १०/४/२०२० रोजी उत्तर सोलापुर तालुक्यातील बेलाटी, डोणगांव, पाथरी, ति-हे सोरेगांव, कुमठे दिनांक !१/४/२०२० रोजी दक्षिण सोलापुर तालुक्यातील हत्तुर, होनमुर्गी, टाकळी, मंद्रुप, कंदलगांव, तेलगाव दिनांक !१२/४/२०२० रोजी कुंभारी, तीर्थ, वळसंग, आचेगांव, होटगी, होटगी स्टेशन दिनांक १३/४/२०२० रोजी मोहोळ तालुकयातील सावळेशूवर, वडवळ नागनाथ, मोहोळ, सयद वरवडे, कामती खुर्द, कामती बुद्रुक दिनांक !४/४/२०२० रोजी अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ, अक्कलकोट शहर, जेऊर, मंगरुळ, तडवळ, सुलरेरजवळगे.