येस न्युज नेटवर्क : दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताविरुद्धच्या पहिल्या डावात अवघ्या 55 धावांत सर्वबाद झाला. आफ्रिकन संघाला सामन्यात पूर्ण सत्रही फलंदाजी करता आली नाही. एकूण 55 धावांसह आफ्रिकेने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वात कमी धावसंख्या करण्याचा लाजिरवाणा विक्रम केला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या नावावर 6 विकेट्स घेऊन किल्ल्याप्रमाणे मजबूत दिसणार्या आफ्रिकन फलंदाजीला उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
याआधी न्यूझीलंडच्या नावावर भारताविरुद्धच्या कसोटीत सर्वात कमी धावसंख्येचा लज्जास्पद विक्रम होता, जेव्हा 2021 मध्ये वानखेडेवर किवी संघ भारतीय संघाविरुद्ध 62 धावांत ऑलआऊट झाला होता. पण दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 55 धावांवर ऑलआऊट होऊन हा वाईट विक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे 2008 मध्ये भारताचा डाव दक्षिण आफ्रिकेनं 76 धावांत गुंडाळला होता. त्याचीच आज परतफेड करत 55 धावात खेळ खल्लास केला.