भारतामधील कोरोना रुग्णांची संख्या ७ हजार ६०० वर पोहोचली असून आतापर्यंत २४९ जणांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या २४ तासांमध्ये एक लाखाहन अधिक नमुना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यांची संख्या वाढवण्याच निर्णय आयसीएमआरने घेतला आहे. १४ एप्रिल पर्यंत चाचण्यांची संख्या दुपटीने वाढवून २.५ लाख नमुना चाचण्या घेण्यात येणार आहेत.