श्री विठ्ठल-रुक्मिणी व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मूर्ती स्थापना वर्धापन दिनानिमित्त भव्य गाथा पारायण व सप्ताह सोहळा…
दक्षिण सोलापूर : श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज वैकुंठवासी श्री सद्गुरु सोपान काका महाराज देहूकर व वैकुंठवासी श्री गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली महाराज देहूकर यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या प्रेरणेने व श्री गुरुवर्य कानोबा महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मौजे गंगेवाडी येथे करण्यात आले आहे.
सदर सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम याप्रमाणे पहाटे चार ते सहा काकडा भजन, सात ते अकरा गाथा पारायण, 11 ते साडेबारा गाथा भजन, दुपारी तीन ते चार गाथा पारायण, चार ते पाच हरिपाठ, सायंकाळी पाच ते सहा प्रवचन, सात ते नऊ संकीर्तन व हरिजागर…
सदर अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात शुक्रवार दिनांक 29/12 /2023 रोजी झाली असून सदर सप्ताहाचा शेवट गुरुवार दिनांक ४/१/२०२४ रोजी सकाळी ८:३० ते १०:३० गुरुवर्य कानोबा महाराज देहूकर (जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर महाप्रसाद होईल…