येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या संचारबंदीचा कालावधी वाढवण्या संदर्भात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच संचारबंदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल. 14 एप्रिल रोजी हा लॉकडाऊन संपणार आहे. यानंतरही लॉकडाऊन वाढवायचा की नाही याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून भाषण करतील आणि त्यात संचारबंदीच्या नव्या निर्णयाची घोषणा करण्याची शक्यता असून याकडे संपूर्ण देशवासीयांची लक्ष लागले आहे.