सोलापूर : शहरात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी उद्यापासून म्हणजेच 11 एप्रिल पासून संचार बंदीच्या कालावधीमधील विविध नवीन आदेश पारित केले आहेत .यातील काही महत्त्वाचे आदेश पुढीलप्रमाणे भाजीपाला खरेदी आणि विक्री करण्याची वेळ सकाळी सहा ते बारा ठेवण्यात आली आहे .दोन भाजीविक्रेत्यांमध्ये दोन मीटरचे अंतर तर खरेदी करणाऱ्या दोघांमध्ये एक मीटरचे अंतर म्हणजेच सोशल डिस्टन्स पाळावे अशा सक्त सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. दूध खरेदी ही दोन टप्प्यात करता येईल सकाळी सहा ते दहा आणि दुपारी चार ते सात .किराणा दुकाने सकाळी सहा ते दोन या दरम्यान उघडतील .मास्कचा वापर करून आणि सोशल डिस्टन्सच्या सूचना पाळून ही खरेदी-विक्री केली जावी असे सूचना दिल्या आहेत . बँकांच्या वेळ उद्यापासून सकाळी आठ ते दोन ही राहणार आहे. खते कीटकनाशके आणि बी-बियाणे खरेदीसाठी सकाळी दहा ते दुपारी दोन ही वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.