सोलापूर – वीस मार्चपासून संपूर्ण सोलापूर जिल्हा लॉकडाऊन आहे. आता लॉकडाऊन होऊनही आता पंधरा पेक्षा जास्त दिवस झाले असून संपूर्ण जिल्ह्यात श्रीसिद्धरामेश्वर महाराज यांच्या कृपेने कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरातील लॉकडाऊन उठवा, अशी मागणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पञ देऊन केलीय.तर तमाम सोलापूरकरांची मागणी आहे, की सोलापूरचा लॉकडाऊन लवकर संपवून, येथे उपलब्ध असलेल्या औद्योगिक व सामाजिक संपन्नतेचा उपयोग करून देशसेवा करण्याची संधी द्यावी.
सोलापुरात कुशल मनुष्यबळ असून पुढील औद्योगिक कार्यात आम्ही जलद गतीने देशाचे मदत करू शकतो. सोलापुरात आगोदरपासूनच
रेडीमेड कापड उद्योग, टॉवेल व बेडशीट उद्योग, रासायनिक व औषधी उद्योग, आयटी इंडस्ट्रीज, स्टील व अल्युमिनियम मोल्डिंग उद्योग, एग्रीकल्चर उद्योग, प्रिंटींग उद्योग, फॅब्रिक इंडस्ट्री आदी उद्योग सक्रिय असून पुरेसा कुशल मनुष्यबळदेखील उपलब्ध आहे . मागील काही दिवसांपासून आम्ही विविध सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था, चेंबर ऑफ कॉमर्स, यंत्रमाग धारक उद्योग संघटना, सोलापूर व्यापारी असोसिएशन अशा अनेक संघटना यांच्याशी फोन-व्हिडीओ कॉल वरून चर्चा करताना सकारात्मक प्रतिसाद मिळालाय.या सर्व उद्योगांमध्ये सोलापूर स्वातंत्र्यपूर्व काळापासून देश सेवा करत आहे. तरी आमची अशी विनंती आहे की भारतात जितके अत्यावश्यक सेवा उत्पादने म्हणजे कापडी मास्क, औषधे, महत्त्वांच्या आयटी कामाचे आउटसोर्सिंग , तसेच धान्य व खाद्यपदार्थ अशा उत्पादनासाठी सोलापूर समर्थ आहे. तरी आपण यादृष्टीने सकारात्मक विचार करून सोलापूरचे लॉकडाऊन उठवून आम्हाला देश कार्य करण्याचे तसेच या मराठी भूमीचे ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उपमहापौरांनी पंतप्रधानांडे केली