इस्त्रायल : इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या अडीज महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजुंनी हवाई हल्ले केले जात आहेत. इस्त्रायलचे सैन्य गाझापट्टीत घुसले असून जमिनीखालील हमासचे सुरुंग शोधून नष्ट केले जात आहेत. असे असताना गाझातील रहिवाशांवर कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आली आहे. तिथेही इस्त्रायल सैन्य हवाई हल्ले करत आहे. रविवारी रात्री केलेल्या हल्ल्यात ७० हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
इस्त्रायलने पॅलेस्टाईनमध्ये कहर मांडला आहे. गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्यात ७० लोक मारले गेले आहेत. एका शरणार्थी शिबिराला लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यात काही घरे सापडली आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार मृत्यूंची संख्या २० हजारच्या वर गेली आहे. यामध्ये दोन तृतियांश महिला आणि मुले आहेत.