सोलापूर :- प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर बुधवार पेठ सोलापूर येथे भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त ,प्रथम भगवान महावीर यांच्या प्रतिमेस हर्षल कोठारी व वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकारणी सदस्या अंजना गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी व प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी.बी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कामगार कॉलनी, नाभिक समाज ,घरेलू काम करणारे, सो. म.पा. क्षेत्रातील सफाई कर्मचारी व गोर गरीब असणाऱ्या सुमारे दोन हजार (2000) वंचित कुटुंबांना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे व हर्षल कोठारी यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले यावेळी नगरसेवक गणेश पुजारी वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक बबन शिंदे वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष रेश्मा मुल्ला सेवानिवृत्त बँका अधिकारी एस आर गजभिये, शारदा गजभिये, अखिल भारतीय बँक सोलापूर शहर SC, ST कर्मचारी संघटनाचे अध्यक्ष सुधीर कांबळे सचिन कोठारी, श्रीपाल कोठारी,श्रेणीक कोचर,अनिल वेध,कामगार संघटनेचे अध्यक्ष अमित गायकवाड, पी.बी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे विजय बमगोंडे पी.बी ग्रुपचे अध्यक्ष बंटी माने विकी शेंडगे सुरज गायकवाड, चंद्रकांत सोनवणे मल्लु सर्वगोड व पी. बी. ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.