दुबई : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलाय. त्याने पॅट कमिन्स याला मागे टाकत हा विक्रम मोडीत काढलाय. पॅट कमिन्सला 20.50 कोटी रुपयात खरेदी केले होते. पण हा रेकॉर्ड अवघ्या अर्ध्या तासात मोडला गेलाय. मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना कोलकात्याने खरेदी केले. मिचेल स्टार्क सात वर्षानंतर आयपीएलमध्ये खेळत आहे. याआधी तो आरसीबी संघाचा सदस्य राहिलाय.
मिचेल स्टार्कसाठी चार संघामध्ये बिडिंग टेबलवर लढत झाली. मिचेल स्टार्कसाठी दिल्ली आणि मुंबई या दोन संघामध्ये आधी लढत झाली. 10 कोटींपर्यंत बोली पोहचल्यानंतर दिल्लीने माघार घेतली. त्यानंतर कोलकात्याने रस दाखवला. मुंबईने माघार घेतली. पण त्याचवेळी गुजरातनेही रस दाखवला. कोलकाता आणि गुजरात या दोन संघामध्ये स्टार्कसाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर कोलकात्याने स्टार्कला ताफ्यात घेतले. कोलकात्याने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले.