बिल्डर असोसिएशन ऑफ इंडीया तर्फे मॅचकॉन प्रदर्शनचे आयोजन बी. ए. आय. बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य संस्था
भारतात बांधकाम क्षेत्रातील मधील सर्व समावेशक, अग्रगण्य, सर्वोच्च व प्रातिनिधिक संस्था म्हणून बिल्डर असोशियेशन ऑफ इंडिया (बी. ए. आय.) ही ओळखली जाते. भारतात सर्व राज्यात मिळून 200 पेक्षा अधिक शाखा व 1,00,000 लाखाहून अधिक सभासद संख्या या द्वारे (बी. ए. आय.) ही कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर फेडेशन ऑफ इंडिया अॅन्ड वेस्टेर्न पॅसिफिक अशोशियन (IFAWPCA) द्वारे ( CICA) या जागतिक संस्थेशी सलंग्न आहे. एशियन हेव्हलपमेन्ट बॅक व वर्ल्ड बॅक याआर्थिक संस्थाची सल्लागार संस्था म्हणून बी. ए. आय ला दर्जा आहे. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील अनेक सघंटनाशी बी. ए. आय सबंधीत असल्याने बांधकाम क्षेत्राचा विविध विचांराचे अधान प्रदान व मते व्यक्त करण्याची संधी उपलब्ध होत असती. बी. ए. आय या संस्थेला एक प्रतिनिधक संस्था म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या अनेक समितीवर अधिकृत मान्यता आहे. त्यामुळे शासनाच्या कर, कामगार पर्यावरण इ. सर्व प्रकारची धोरणे व कायदे ठरवताना सहभागी होता येते.
सोलापूर शहर जिल्हयातून अतिशय जोमाने बांधकाम क्षेत्रामध्ये कामे सुरू आहेत, ख-या अर्थाने शहराचा विकास व त्याची व्याप्ती ही बांधकामावरच अवलंबून असते, अशा सर्व बांधकाम व्यवसायिकांना साथ लागते ती मशनरीची अशा सर्व मशिनरी उत्पादन करणा-या कंपनींना व बांधकाम व्यवसायिकांना एकत्र एका ठिकाणी एका व्यासपीठावर आणण्याची संधी ख-या अर्थाने बी. ए. आय सारखी संस्था देते
सोलापूर शहरांमध्ये दिनांक 23, 24, 25 डिसेंबर रोजी मॅचकॉन्स या मशिनरी व प्रॉपर्टीच्या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जुनीमिल कंपाउंड येथे या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री एस. एन. रेड्डी बी.ए.आय. ऑल इंडिया प्रेसिडेंट् यांच्या हस्ते व सुनिल मुंडदा व्हाईस प्रेसिडेंट्, सचिन देशमुख स्टेट चेअरमन, यांच्या उपस्थित व सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. प्रणितीतीई शिंदे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. समाधान अवताडे उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचा बक्षिस वितरण समारंभ व खरेदी करणा-या वाहनाची चावी प्रदाण कार्यक्रम दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता मा. खासदार जयसिध्देश्वर स्वामी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
सदर प्रदर्शनामध्ये एकूण 55 स्टॉल असून कंस्ट्रक्शन मशनरीचे 35 स्टॉल आहेत, बिल्डींग व प्रॉपर्टी 20
स्टॉल आहेत. प्लॉट व लेआउट, बॅक व इतर स्टॉल आहेत. कंस्ट्रक्शन मशनरी प्रदर्शनामध्ये खरेदी करणा-यास चांगल्या प्रमाणात खास सुट (Discount) देण्यात येईल. व सदर प्रदर्शनाच्या ठिकाणी घर किंवा प्लॉट खरेदी केल्यास 10% टक्के सुट (Discount) देण्यात येईल. असे एक्झिबिशन यापूर्वी सुध्दा सोलापूर शहर जिल्हयातून बी. ए. आय संस्थेने आयोजित केले, त्यातून ब-याच जणांना घर मिळाली, ब-याच मशिनरींची विक्री झाली.
शहराचा सर्वांगीण विकासामध्ये खारीचा वाटा उचलणारी संस्था म्हणजे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडीया म्हणता येईल. सर्व सोलापूर शहर जिल्हयातील रहिवाशी व बांधकाम व्यवसायांनी प्रर्दशनास भेट दयावी.