सोलापूर : लग्नाला काही तास शिल्लक असतानाच नवरी मुलीने भर मंडपातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास सोलापुरात घडली. सालिया महेबुब शेख (वय २५, रा. ओम नम: शिवाय नगर, कुमठेगाव रोड, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. दरम्यान, सोमवार १८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी पहाटे पावणे सहाच्या सुमारास राहत्या घरी बेडरूममध्ये सिलिंगच्या फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. तिला नातेवाईकांनी खाली उतरवून बेशुध्द अवस्थेत पोलिस हेड कॉन्स्टेबल ए. एम. गावडे यांनी उपचारासाठी शासकीय रूग्णालय, सोलापूर येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. रामकृष्ण ढोके यांनी सांगितले.