सोलापूर : युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्यावतीने सर्वसमर्थ देव, सनातन पिता, कृपाळू व शांती अधिपती “प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव” साजरा करण्यात येतो. यानिमित्त वोरोनोको शाळा, रंगभवन जवळ, सोलापूर येथे शुक्रवार दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी सायं. ५ ते रात्रौ १० वा. यावेळेत “आनंद सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे चौदावे वर्ष आहे.
संगीत, नृत्य व नाटिका- सांस्कृतिक मेजवानी व संदेश
या ख्रिसमस फेस्टीव्हलमध्ये सोलापूरातील चर्चेस, सेवाभावी संस्था व शाळा गायन, नृत्य व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. यामध्ये १) ज्योती निकेतन संस्था, २) पहिली ख्रिस्ती मंडळी ३) हिंदूस्थानी कव्हनंट चर्च, ४) मेथॉडीस्ट चर्च, ५) गुड न्यूज चर्च, ६) न्यू लाईफ फेलोशीप चर्च, ७) पाईन ट्री चर्च, ८) एपीफनी चर्च, ९) उमेदपूर चर्च, १०) शिलोह चर्च, ११) बैरशेबा चर्च, १२) बिलीव्हर्स इस्टर्न चर्च, वैराग, १३) कालवरी चर्च, १४) वोरोनोको शाळा, १५) पहिली ख्रिस्ती मंडळी-नवीन उपासना मंदिर आदी चर्चेस, शाळा व ख्रिस्ती संस्था सहभागी होणार आहेत.
प्रारंभी प्रार्थना व स्वागतगीत होईल, त्यानंतर सोलापूरातील पाळकवर्गाच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न होईल. सांस्कृतिक कार्यक्रम दोन सत्रात होतील. पहिल्या सत्रानंतर ख्राईस्ट फॉर ऑल मिनिस्ट्रीज चर्चचे पाळक मा. निरंजन उजागरे हे पवित्र शास्त्रातून संदेश देतील. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे दुसरे सत्र सुरु होईल. शेवटी आभार प्रदर्शनासह संपूर्ण भारतासाठी, महाराष्ट्रासाठी व सोलापूरच्या शांती व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.
विविध स्टॉल्स
यावेळी विविध स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये धार्मिक पुस्तके, ख्रिससम डेकोरेशन, खाण्यांचे व कपड्यांचे विविध स्टॉल्स असणार आहेत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी सर्व लोकांनी या कार्यक्रमास यावे, असे आवाहन युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्यावतीने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेव्ह इम्मानुएल म्हेत्रे, रेव्ह. सुभाष माने, ब्र. सॅमसन बांभळ, पास्टर संजीव मोरे, पास्टर अनिल गायकवाड, पास्टर गिदोन अढागळे, पास्टर सुहास बावडेकर, पास्टर निरंजन उजागरे, रेव्ह. सतीश गडकरी, ब्र.डॉ. विश्वास पॉल, पा. जॉन दिनकर, रेव्ह. मधुकर बनसोडे, रेव्ह. विनयकुमार जेनिस, पास्टर मनोज चांदणे, पास्टर संभाजी फाळके, पास्टर मोजेस आखाडे, पास्टर डेव्हीड बनसोडे, ब्र.प्रदीप बनसोडे आदी पाळकवर्ग प्रयत्न करीत आहेत.