सोलापूर : साखरेचे खाणार त्याला सोलापूर जिल्हा देणार ! असे वाक्य सोलापूर जिल्ह्यांना लागू पडते .कारण सोलापूर जिल्ह्यात भारतातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत . आता कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी जगभरात सध्या तरी औषध नाही. हात धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हे दोनच उपाय सध्यातरी आहेत .
देशभरात सॅनीटायझरचा मोठा तुटवडा आहे. मागणी आणि पुरवठा यामध्ये प्रचंड मोठी तफावत असल्यामुळे बाजारामध्ये त्यांनी टायझर चढ्या भावाने विकली जात आहे .अशातच सोलापूरसह राज्यभरातील आणि देशभरातील भयभीत झालेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एक डझन साखर कारखाने आता सॅनीटायझर निर्मिती करू लागले आहेत. ज्या साखर कारखान्याकडे डिस्टलरी प्लान्ट आहे आणि बॉटलिंग करण्याची क्षमता आहे अशा साखर कारखान्यांना परवानगी दिल्या असून सध्या तीस हजार लिटर ते तीन लाख लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर टायझर ची निर्मिती सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे त्यामुळे इतर राज्यात देखील सोलापूरचे सॅनीटायझर पाठवले जाणार असल्याची अशी माहिती सोलापूरचे औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त भुषण पाटील यांनी Yes News मराठी’शी बोलताना दिली.
माळशिरस तालुक्यातील श्रीपुर च्या ब्रिमा सागर, माढा तालुक्यातील विठ्ठल कार्पोरेशन ,मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर , बीबीदारफळ लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज, पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना,, मंगळवेढ्यातील फॅबटेक शुगर, श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर, तसेच टेंभुर्णी Midc मधील खंडोबा डिस्टलरी आणि सोलापूर Midc मधील लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह डिस्टलरी यांनादेखील सॅनीटायझर निर्मितीचा परवाना देण्यात आला आहे.