सोलापूर : न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करून घेण्यासाठी न्यायालयातील क्लार्क यांना ५० हजार रूपये द्यावे लागतील असे सांगून ४५ हजार लाचेची मागणी करून त्यातील दुसरा हफ्ता २० हजार रूपये स्वीकारताना सोलापुरातील एका वकीलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दयानंद मल्लिकार्जुन माळी (रा. माळी वस्ती, सोरेगाव, विजापूर रोड, सोलापूर) असे लाच स्वीकारलेल्या वकिलाचे नाव आहे. केसचे निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी व निकालपत्रासाठीपुणे येथील क्लार्क यांना ५० हजार द्यावे लागतील असे सांगून यापूर्वी घेतलेले ५ हजार वजा करून उर्वरित ४५ हजार रूपये लाचेची मागणी करून त्यातील दुसरा हफ्ता २० हजार रूपये स्वीकारताना वकिलाला रंगेहात ताब्यात घेण्यात आले.