सोलापुर :एकीकडे देश कोरोनाशी दोन हात करत असताना सोलापुरात मात्र काही लोकांकडून त्याला हारताळ फासले जात असल्याचं पाहायला मिळालेय. भवानी पेठ भागात नमाज पडण्यासाठी जमा झालेल्या चाळीसहून अधिक लोकांना जोडभावी पेठ पोलीसांनी ताब्यात घेतलेय. भवानी पेठेतील चिराग अली मश्जिद नजीक असलेल्या मदरशामध्ये तब्बल ४० ते ४५ मुस्लिम धर्मीय लोक सामूहिक नमाजसाठी एकत्र आले होते. त्यामुळे जोडभावी पेठ पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतलेय. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जोडभावी पेठच्या पोलीस निरीक्षकांनी दिलीय